सांगलीत एकाच झाडावर 22 जातीचे देशी-परदेशी आंबे! दरवर्षी जवळफास 2 लाख आंब्याच्या रोपांची विक्री

Continues below advertisement

सांगली : जत तालुक्यातील काकासाहेब सावंत या शेतकऱ्यांने एकाच आंब्याच्या झाडावर 22 प्रकारच्या जातीचे आंबे घेण्याची किमया साधलीय. यामध्ये केशर, हापुस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी अशा देशी आणि काही  विदेशी आंब्याच्या जाती समाविष्ट आहेत. एकाच झाडाला सावंत यांनी वेगवेगळ्या जातीची 44 कलम केली. यातील 22 जातीचे कलम लागू झाले आणि यंदा या एकाच झाडांच्या आंब्याला 22 प्रकारचे आंबे लगडले आहेत. यातील काही आंब्याचा तोडा झाला आहे. 22 जातीच्या मिळून जवळपास 700 आंबे लागले होते. काही जातीचे 4-4 डझन तर काही जातीचे 2-3 डझन आंबे लागलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram