Saurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरची ट्वेंटी 20 विश्वचषकात कमाल, कुटुंबाशी खास बातचीत

Saurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरची ट्वेंटी 20 विश्वचषकात कमाल, कुटुंबाशी खास बातचीत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या साखळीत पाकिस्तानला सलामीलाच धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यजमान अमेरिकेनं बलाढ्य पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी पराभव करून नवा इतिहास घडवला. मूळचा मुंबईकर आणि मराठमोळा सौरभ नेत्रावळकर अमेरिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा एक प्रमुख शिल्पकार ठरला. या सामन्यात अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 19 धावांचं आव्हान दिलं होतं. पण सौरभ नेत्रावळकरनं सुपर ओव्हरमध्ये इफ्तिकार अहमदला बाद करून पाकिस्तानला केवळ 13 धावाच दिल्या. त्यामुळं अमेरिकेला पाच धावांनी सनसनाटी विजय साजरा करता आला. अमेरिकेचा हा गटातला दुसरा विजय ठरला. या सामन्यातल्या पराभवानं पाकिस्तानवरचं दडपण वाढलं असून, रविवारच्या साखळी सामन्यात पाकिस्तानसमोर भारताचं आव्हान आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola