Nagar Panchayat Election Result : नगरपंचायत निवडणुकांचे आज निकाल, 19 उमेदवारांची बिनविरोध निवड!
नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या 106 नगरपंचायती आणि भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांची आज मतमोजणी होतेय. एबीपी माझावर या निवडणुकीचे निकाल सर्वात आधी आपण पाहू शकणार आहात. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानं ही निवडणूक दोन टप्प्यांत झाली. ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील 106 नगरपंचायतींमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत मतमोजणीपूर्वीच 19 उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. रायगडच्या तळा नगरपंचायतीत शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झालाय.
Tags :
Nagar Panchayat Result Nagar Panchayat Election Result Maharashtra Nagar Panchayat Election Result Nagar Panchayat Election 2021 Result 2021 Nagar Panchayat Elections Result Maharashtra Nagar Panchayat Result Nagar Panchayat Poll Result Nagar Panchayat News Panchayat Election News Panchayat Result Today Maharashtra Panchayat Result Maharashtra Panchayat Result