Nagpur ST : नागपूरच्या गणेशपेठ आगारात 18 कर्मचाऱ्यांचं निलंबिन, राजकीय नेत्यांसोबत केले होते आंदोलन
नागपूरच्या गणेशपेठ आगारातील 18 कर्मचाऱ्यांना एसटीच्या विभागीय नियंत्रकांनी निलंबित केलं आहे. या सर्व 18 कर्मचाऱ्यांनी 31 ऑक्टोबर रोजी गणेशपेठ बस स्थानकावर काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं होतं. तसंच एसटीच्या चाकांची हवा काढून गोंधळ निर्माण केला होता. त्याच 18 कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आलं आहे.