Shivsena MLA Disqualification : शिंदे गटाच्या 16 आमदारांकडून 6 हजार पानांचे लेखी उत्तर सादर
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात गाजलेल्या आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांनी ६ हजार पानांचे लेखी उत्तर सादर केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे सविस्तर उत्तर सादर करण्यात आलं आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं होतं. तेव्हापासून, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Tags :
Rahul Narvekar Legislative Assembly Speaker MLAs Supreme Court Power Struggle Uddhav Thackeray Group Maharashtra Submitted Written Answer Power Struggle 16 MLAs Disqualification Case Shiv Sena Shinde Group Detailed Answer