डोंबिवलीच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार
अभिजीत देशमुख
Updated at:
23 Sep 2021 04:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाकीनाका घटनेनं राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे.