130th Amendment Bill | लोकसभेत गदारोळ, विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून शाहांच्या अंगावर भिरकावला

लोकसभेत 130 व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून मोठा गदारोळ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हे विधेयक सादर केले. काँग्रेस, एमआयएम आणि सपाच्या खासदारांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला. काही आक्रमक खासदारांनी विधेयकाचा मसुदा फाडून तो अमित शहांच्या दिशेने भिरकावला. या नव्या विधेयकानुसार, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना तीस दिवसांपेक्षा जास्त काळ अटक झाल्यास त्यांची खुर्ची आपोआप जाईल. विरोधकांच्या गोंधळानंतरही हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. "संसत सदस्य हो, मर्यादा की पालन करो। कभी कोइने मर्यादा ऐसी खराब नहीं की। आप ऐसे मत करिए। मर्यादा खराब। नो।" असे आवाहन यावेळी करण्यात आले. जम्मू काश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 आणि संघ राज्य क्षेत्र शासन अधिनियम 1953 मध्ये सुधारणा करणारी विधेयकेही सादर करण्यात आली. या विधेयकांवर आता संयुक्त संसदीय समिती विचार करेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola