100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 14 Spet 2024 : 10 AM
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रंक आणि ड्राईव्हची घटना, बाळाचं बारसं आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला स्कॉर्पिओची धडक, अपघातात दीड महिन्याच्या बाळासह चार जणांचा मृत्यू.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात,मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार असल्याची माहिती.
विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी, पितृपक्षानंतर भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता.
मुंबईतील मतदारसंघांसाठी भाजपची मोर्चेबांधणी, प्रत्येक विधानसभा अध्यक्षासहित समन्वयक आणि प्रभारींकडून मतदारसंघाचा आढावा घेत व्यूहरचना आखली जाणार.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, लालबागसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देणार, तर फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा मास्टर स्ट्रोक खेळणार , 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान विधानसभेचं एक दिवसीय अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत. यामुळे मराठवाड्य़ातील मराठा समाज हा कुणबी होऊन ओबीसी मध्ये जाऊ शकतो.