Top 100 News : 6 AM Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा : 25 July 2024 : ABP Majha
Top 100 News : 6 AM Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा : 25 July 2024 : ABP Majha
मुंबई शहर उपनगरामध्ये जोरदार पाऊस.. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधार, जागोजागी पाणी साचण्यास सुरुवात, मुंबईत आज यलो अलर्ट
पालघरच्या सूर्या प्रकलपातील धामणी धरण ओव्हरफ्लो, धरणाचे तीनही दरवाजे 40 मीटरने उघडले, त्यामुळे धामणी आणि कवडास ह्या दोन्ही धरणांमधून जवळपास 22 हजार क्युसेकने पाण्याच विसर्ग.
चिपळूणमधील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, पुराचे पाणी खेड मार्केटमध्ये, खेड नगरपरिषदेकडून नागरिकांचा सतर्कतेचा इशारा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये एकूण ६१.८७ टक्के पाणीसाठा, तुलसी धरण १०० टक्के भरलं तर विहार धरण ९१ टक्के भरलं.
पुण्यातील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदी पात्रामध्ये ९ हजार ४१६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता.
पुण्यातील मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ, डेक्कनमधील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय.
पुरंदर तालुक्यातील सासवडसह पाच गावांना पाणीपुरवठा करणारं गराडे धरण १०० टक्के भरलं, धरणाच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रात यायला सुरु