ABP News

100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025

Continues below advertisement

जिथं चुकीचं काम, तिथं बुलडोझर चालवणार, नागपूर हिंसाचार प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य...नागपूरमध्ये घेतली आढावा बैठक...दंगेखोरांना सरळ करण्याचा इशारा...

नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १०४ आरोपींची ओळख पटली, ९२ जणांना अटक...

दिशाप्रकरणी उद्धव ठाकरेंनी दोनदा फोन केले, आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्याची विनंती केली, नारायण राणेंचा दावा....तर कचऱ्यावर लक्ष देत नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार...

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट...सुशांतसिंहनं आत्महत्याच केल्याचं स्पष्ट...सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट...

भेटण्यासाठी त्यांच्याकडे संस्था आहेत, आमच्याकडे काही नाही म्हणून भेट टाळतो, अजित पवार, जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांची आगपाखड...तर भेटीवरून राळ उठवणं योग्य नाही, मित्रपक्षांनी राऊतांना फटकारलं...


वसंतदादा शुगर इन्स्टियूटच्या बैठकीसाठी पोहोचताना शरद पवार आणि अजितदादांची नजरानजर, हातवारे, तर जयंत पाटलांची दादांसोबत बंद दाराआड चर्चा...
-----------------------------
((पवारांच्या भेटीगाठी, तर्कवितर्कांची दाटी))

एक एप्रिलपासून कांद्यावरी निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय... कांद्यांवरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द.. केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यातल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...

मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका, पोलीस प्रशासनाची परवानगी, महापालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावर काय बोलणार याची उत्सुकता


कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अखेर २० टक्के निर्यात शुल्क मागे, १ एप्रिल २०२५ पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार.

यवतमाळच्या पुसद आगाराला मिळाल्या १० नवीन बसेस. लोकार्पण कार्यक्रमात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः चालवली बस. याप्रसंगी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईकही उपस्थित. 

रत्नागिरीच्या खेडमधील भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषण स्थळाला पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली भेट. सामंतांच्या आश्वासनानंतर सहा दिवसांपासून सुरु असलेले उपोषण कोकरेंनी सोडलं.

शिर्डीत 13 वं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन. संमेलनात अनेक वारकऱ्यांचा सहभाग, आज मंत्री उदय सामंत आणि नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार. 

छत्रपती संभाजी महाराजांचं रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबामध्य़े स्मारक उभारलं जाणार. याच ठिकाणी संभाजी महाराजांना झाली होती अटक. उद्योग मंत्री उदय सामंतांकडून स्मारक स्थळाची पाहणी. पाहणीनंतर सामंतांनी घेतली आढावा बैठक. 

परभणीत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई, ४ जणांवर गुन्हे दाखल, २१ जणांवर करण्यात आली प्रतिबंधात्मक कारवाई, तर २७ जणांना नोटीसा.


भंडारा आयुध निर्माणी स्फोट प्रकरणी आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, चौकशीअंती आयुध निर्माणीचे एकूण सात अधिकारी दोषी. २४ जानेवारीला झालेल्या भीषण स्फोटात ९ कर्मचाऱ्यांचा झाला होता मृत्यू.

लातूर महापालिकेकडे सव्वादोन कोटींची महसूलाची थकबाकी, लातूरच्या तहसील कार्यालयाने पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीसा देण्यास केली सुरुवात, दोन दिवसात भरणा न केल्यास गाळे सील करण्याचा दिला इशारा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram