100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

Continues below advertisement

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादीचाही मोठा विजय झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार (Sharad Pawar) यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केले. त्याला 20 फूट जमिनीत गाढण्याचे काम तुम्ही केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 2019 साली आपल्या सोबत द्रोह केला, त्यांना आपण त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. शिर्डी येथे आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात (BJP Maha Adhiveshan) ते बोलत होते.  
 
अमित शाह म्हणाले की, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. इतक्या मोठ्या संख्येने आपले कार्यकर्ते आमदार झाले, मंत्री झाले. खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादीचाही मोठा विजय मिळाला. महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केले. त्याला 20 फूट जमिनीत गाढण्याचे काम तुम्ही केले आहे. उद्धव ठाकरे यांनी 2019 साली आपल्या सोबत द्रोह केला, बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतांना सोडले. त्या उद्धव ठाकरेंना आपण त्यांची जागा दाखवली. 1978 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरता दिसून आली. त्या अस्थिरतेच्या राजकारणाला संपवून तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार निवडून देण्याचे काम केले, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram