Top 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE
Top 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE
नाराज छगन भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर थेट हल्लाबोल...तिघेच निर्णय घेतात, आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार...पवारांच्या पक्षात मान होता, आता चुकीची वागणूक, भुजबळांची खंत...
आपल्याला मंत्री करण्यासाठी फडणवीस, आग्रही होते पण त्यांचं कुणी ऐकलं नाही, भुजबळांचा गौप्यस्फोट...लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा असल्याचं केलं स्पष्ट...
छगन भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात, नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य, नाराज असलेल्यांचे निरोप येत असल्याचाही दावा
छगन भुजबळांवर अन्याय झालाय, पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर समर्थकांची प्रतिक्रिया तर अजित पवारांच्या बारामतीमधल्या निवासस्थानाबाहेर ओबीसींचं आंदोलन
नागपूरमधल्या विधानभवनात उद्धव ठाकरेंनी घेतली भडणवीसांची भेट...पुष्पगुच्छ देत शुभेच्छा...नंतर राहुल नार्वेकरांनाही भेटून केली बातचीत...
विधिमंडळात केवळ दहा फूट अंतरावर असतानाही उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची नजरानजर नाही...ठाकरे आणि पटोलेंनी भेटणं टाळलं का याची चर्चा...