Sangli Janata Curfew | सांगलीत आजपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध
सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या वाढत असल्याने आजपासून जिल्ह्यात 10 दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी या जनता कर्फ्यूला विरोध केला आहे. मात्र रस्त्यावरील फळे, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद करण्यात येणार असून आठवडी बाजारही बंद केले आहेत.