बाकीचे काम करत नसल्यानं शरद पवारांना या वयात फिरावं लागतयं : देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
शरद पवार साहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, वडिलांना वाटतं आपल्या मुलांना काही कळत नाही. म्हणून ते माझ्याबद्दल बोलले असतील. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तशीच भावना असते. त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. कदाचित माझ्या खांद्यावरुन त्यांना वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची असेल. तुम्ही देखील काही तरी करा असं सांगायचं असेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी 'फडणवीस कोकणात आले तर चांगलंच आहे. ते नागपूरचे आहेत. नागपूरचा आणि विदर्भाचा संबंध नाही. त्यामुळं इथं त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मी बारामती सारख्या दुष्काळी भागातून येतो फडणवीस विदर्भातून येतात,त्याबचा समुद्राशी काहीही संबंध नाही त्यामुळे ते येत आहेत हे चांगलं आहे', असं टोला लगावला होता.
यावेळी फडणवीस म्हणाले की, 81 वर्ष वय असताना शरद पवार फिरत आहेत. कदाचित हे काम करत नसतील म्हणून त्यांना फिरावं लागत असेल, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
यावेळी फडणवीस म्हणाले की, 81 वर्ष वय असताना शरद पवार फिरत आहेत. कदाचित हे काम करत नसतील म्हणून त्यांना फिरावं लागत असेल, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
Continues below advertisement