Sangli Lockdown | सांगलीत 22 ते 30 जुलैदरम्यान महापालिका,नगरपालिका,नगरपंचायत क्षेत्रात लॉकडाऊन
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे, 22 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः सांगली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा लॉकडॉऊन करण्याच्या बाबतीत प्रशासनाच्या विचार सुरु होता.