हज यात्रेवर तब्बल 90 वर्षानंतर सीमित निर्बंध,कोरोनामुळे बाहेरच्या देशातून येणाऱ्या यात्रेकरुंना मनाई

Continues below advertisement

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. जगप्रसिद्ध अशा हज यात्रेवरही त्याचं सावट आहे. त्यामुळेच यावेळी सौदी अरेबियानं बाहेरच्या देशांतून येणाऱ्या यात्रेकरुंना मनाई केली आहे. त्यामुळे तब्बल 90 वर्षानंतर हज यात्रेवर असे निर्बंध लावण्याची वेळ आली आहे.

हज यात्रेलाही कोरोनाचा फटका बसला आहे. 1932 नंतर पहिल्यांदाच यात्रेवर निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. सिमीत यात्रेकरुंसह हज यात्रा पार पडणार आहे. ज्या निर्णयाकडे जगभरातल्या मुस्लीम यात्रेकरुंचं लक्ष लागलेलं होतं. तो निर्णय अखेर सौदी अरेबियानं जाहीर केला. हज यात्रेसाठी बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी यावेळी बंदी घालण्यात आलीय. या यात्रेसाठी यावेळी भारतातून 2 लाख 30 हजार यात्रेकरुंनी बुकिंग केलं होतं. या सगळ्यांचे पैसे कुठल्याही चार्जविना परत करणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram