Amit Deshmukh | लवकरच राज्यातील ग्रंथालये सुरू होतील,ग्रंथालयं सुरू होण्याबाबत अमित देशमुखांचे संकेत
Continues below advertisement
'वाचाल तर वाचाल' या शब्दांमध्येच सारं काही आलं. पुस्तकं, वाचन याबाद्दल कमीत कमी शब्दात व्यक्त होता येतं आणि त्याचं महत्व देखील कळतं. महाराष्ट्राला साहित्यसंपदेची, लेखकांची, कलाकारांची, संस्कृतीची एक वेगळीच देणगी लाभली आहे. अगदी श्रीलंकेतील सिंहली भाषेत देखील आपल्याला मराठी भाषेचे दाखले दिसून येतात. विपुल अशी साहित्यसंपदा लाभलेली भाषा म्हणजे मराठी. राज्यात विविध भाषांमधील साहित्य उपलब्ध असलेली ग्रंथालयं देखील मोठ्या संख्येनं आहेत. गाव-खेड्यांमध्ये देखील छोटी- छोटी वाचनालयं आहेत. पण, यासाऱ्यांसमोर सध्या आव्हान, समस्या आणि संकटं उभी राहिली आहेत.
Continues below advertisement