Vidhan Bhavan Mejavaniche Vartaman | विधानभवनात चांदीच्या थाळीतून मेजवानी, लाखोंची उधळपट्टी
मुंबईतील विधानभवनात संसद आणि राज्य विधीमंडळ अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला. खर्चात काटकसर करण्याचा सल्ला देणाऱ्या समितीच्या कार्यक्रमात चांदीच्या थाळीतून पंच पक्वान्नांची मेजवानी देण्यात आली. सुमारे सहाशे आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी झाल्याचे कळते. या प्रकरणावर अनेक मंत्री आणि संबंधित अधिकारी मौन पाळत आहेत.