
Latur Tomato : टॉमॅटोला भाव 80 पैसे किलो, शेतकरी संतप्त : ABP Majha
Continues below advertisement
महिना-दीड महिन्यापूर्वी दीडशे रुपये किलोने जाणाऱ्या टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक झालेत. त्यातच लातूर बाजारपेठेत टोमॅटोला अवघा ८० पैसा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजी मंडईतच आंदोलन केलं. २५ ते ३० किलोच्या कॅरेटला फक्त वीस ते दीडशे रुपयांचा भाव मिळतोय. लातूरच्या बाजारपेठेत पाच ते सात हजार क्रेट टॉमॅटोची आवक झालीय. पण भाव नसल्याने भाजी मंडईतच टॉमॅटो फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. नफा सोडाच पण टोमॅटोचा खर्च, वाहतूक खर्च वसूल होत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अक्षरशा हवालदिल झालाय.
Continues below advertisement