Student Protest | प्राचार्यांच्या निलंबनासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच, विद्यापीठाचा कारवाईचा इशारा ! | ABP Majha
लातूरच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थींनी आंदोलन मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिलाय. तसेच दोन दिवसात तोडगा काढला जाईल असं महाविद्यालयाकडून सांगण्यात आलंय. मात्र विद्यार्थी लेखी आश्वासनावर ठाम आहेत. मागील तीन दिवसांपासून लातूरच्या कृषी महाविद्यालयात विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत आहेत. प्राचार्य बाबासाहेब ठोबरे यांची तात्काळ बदली करावी या मुख्य मागणीसह अनेक मागण्या आहेत.