Parliament Security Breach : संसद घुसखोरीतला आरोपी अमोल शिंदेच्या मूळगावी पोलिसांची टीम

Continues below advertisement

Parliament Security Breach : संसद घुसखोरीतला आरोपी अमोल शिंदेच्या मूळगावी पोलिसांची टीम

नवी दिल्ली :  लोकसभेत 
(Lok Sabha)  घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही माहिती दिली आहे.  संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी (Security Breach in Lok Sabha)  चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. तर संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री आज संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.  पोलिस तपासाबाबत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  दोन्ही सभागृहात माहिती देणार आहे.

केंद्रीय गृह खात्यानं अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत. चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेच्या भंगाच्या कारणांची चौकशी करेल, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह ही समिती आपला अहवाल लवकरात लवकर सादर करेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram