Latur Water Scarcity : लातूर शहरात भीषण पाणीटंचाई, हाउसिंग सोसायटीत रोज तीन ते चार टँकरने पाणीपुरवठा
लातूर भारतातील अस शहर ज्या शहरात पाण्याचे दुर्भिक्ष कायमचा आहे. याची तीव्रता उन्हाळ्यात मात्र अधिकच जाणवते. दुष्काळाच्या दहा ते पेक्षा पाण्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या झळा लातूरकरांना सहन करावे लागत आहेत. सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी कोट्याळधी रुपये खर्च करणाऱ्या लातूरकरांची ही व्यथा संपता संपेना
ही आहे लातूर मधली सहारा क्लासिक हाउसिंग सोसायटी.... या इमारतीत 26 कुटुंब राहतात... बोरचे पाणी मार्चमध्ये साठला आहे... त्यावेळेस पासून दररोज सातशे रुपये टँकर प्रमाणे तीन ते चार टँकर पाणी त्यांना विकत घ्यावे लागत आहे... पिण्याचे पाणी दहा रुपये पासून 20 रुपये चार प्रमाणे विकतच तर घ्यावच लागतं त्यात आता हा वाढीव खर्च... सात दिवसात येणाऱ्या नळ्याचा पाणी काय तो तेवढाच एक दिवसाचा दिलासा आहे.... सांडपाण्यासाठी दररोज 2100 रुपये चा खर्च या हाऊसिंग सोसायटीला करावा लागतो.. तब्बल एका सोसायटीचा खर्च साठ हजार रुपये.... पिण्याच्या पाण्याचा खर्च चाळीस हजार रुपये गृहीत धरला तर एका हाऊसिंग सोसायटीला महिन्याचा एक लाख रुपये चा खर्च हा फक्त पाण्यावर करावा लागतोय...