Latur Water Crisis : पावसाची पाठ, लातूर जिल्हा पाणीसंकटाच्या विळख्यात
पावसाने लातूर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील १७१ लहान मोठ्या प्रकल्पात अवघा २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एम.आय.डी.सी.च्या पाणीपुरवठ्यात कपात होणार असून लातूर शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. तसेच बांधकामांवरही निर्बंध घालण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन पिण्याच्य़ा पाण्याला प्राधान्य देणार आहे. पावसाने दीड महिन्यापासून जिल्ह्यावर मोठं जलसंकट ओढावलंय. शेतकऱ्यांनाही मोठी झळ बसतेय. याचा संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी