ABP News

Latur Sharad Pawar Killari Earthquake:किल्लारी भूकंपाला ३० वर्ष ,पवारांसाठी किल्लारीत कृतज्ञता सोहळा

Continues below advertisement

30 सप्टेंबर 1993, हाच तो काळा  दिवस. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले.. 52 खेडेगावातील तीस हजारांच्या आसपास घरे आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या..तर उस्मानाबादमधील सास्तूर परिसरातही मोठ्या प्रमाणात भूकंप झाला.. आज किल्लारी आणि सास्तूर येथील भूकंपाच्या घटनेला ३० वर्ष पूर्ण झालेत.. दरवर्षी प्रमाणे यावर्षी आजच्या दिवशी भूकंपात मृत्यू पावलेल्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे..त्यासोबतच आज किल्लारीमध्ये शरद पवारांसाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेय. १९३मध्ये ज्यावेळी भूकंपाच्या घटना घडल्या त्यावेळेस शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.. आणि शरद पवार यांचे नियोजन आणि कामाच्या झपाट्यामुळे किल्लारीसह बावन गाव या धक्क्यातून सावरली होती. शरद पवार यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram