
Latur Onion : लातूरच्या बाजारात कांद्याची मोठ्याप्रमाणात आवक, चौपट वाहनं आल्यानं प्रचंड कोंडी
Continues below advertisement
लातूर येथील महात्मा फुले भाजीपाला बाजारामध्ये आज कांदा, बटाटा, वांगी यासह मिरच्यांची तुफान आवक झाली आहे. आज दुपारपासूनच भाजी बाजाराकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या... लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकातील भाग धाराशिव जिल्हा आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती... आज कांद्याचा लिलाव असतो यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लातूर बाजाराकडे आपला माल घेऊन येणे पसंत केलं होतं... या सर्व कारणामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा निर्माण झाल्या.
Continues below advertisement