Riteish Deshmukh And Genelia Deshmukh यांच्या कंपनीसीठी अवघ्या 10 दिवसात भूखंड मंजूर : ABP Majha
Continues below advertisement
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या कंपनीसाठी अवघ्या 10 दिवसात लातूर एमआयडीसीत (Latur MIDC) भूखंड मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला महिन्याभरातच 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आलं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यावर लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत.
Continues below advertisement