Latur : लातूरमध्ये वसतीगृहात मुलीने जीव दिला; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Latur : लातूरमध्ये वसतीगृहात मुलीने जीव दिला; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप लातूर येथील वस्तीगृहात राहणाऱ्या 15 वर्ष वयाच्या मुलींने वस्तीगराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.. यानंतर परिवारातील नातेवाईक विविध सामाजिक संघटना यांनी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली.. ही आत्महत्या नव्हे तर घातपात आहे अशी शंका व्यक्त करण्यात आली.. दोषी लोकांना शासन होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली होती.. मृतदेहाची उत्तरीय तपासणी लातूर झाल्यानंतर ही पुन्हा सोलापूरला होत आहे. या घटनेला 35 पेक्षा अधिक तास झाले आहेत... मृतदेह संध्याकाळी सोलापूर कडे पाठवण्यात आला. सायली सिद्धार्थ गायकवाड ही 14 ते 15 वर्षाची मुलगी... नववी वर्गात शिकत होती.. काहीच दिवसांपर्वी आठवीचा निकाल लागला.. लातूरच्या महात्मा गांधी विद्यालय येथे तिचे शिक्षण सुरू होत. मागील एक वर्षापासून ती लातूरच्या कस्तुरबा कन्या छात्रालयात राहत होती .नववीच्या वर्गात जाण्याचा उत्साह तिच्यात होता. यासाठी चाकूर तालुक्यातील आपल्या गावावरून ती लातूरला दाखल झाली. दोनच दिवसापूर्वी पहाटेच्या वेळी तिने वस्तीगृहाच्या दुसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.. तिला तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना काल तिचा मृत्यू झाला.