Latur Hail Strom : लातूरमध्ये अवकाळी पावसाचा फटका, शेतीचं मोठं नुकसान

Continues below advertisement

 मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला होता.आज दुपार पासूनच जिल्ह्यात ढग दाटून आले होते. मागील एक तासापासून लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. जोरदार वाऱ्यासह विजेचा गडगडात सुरू होता. यातच तुफान पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस आणि गारा लातूर शहर लातूर ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. कोपेगाव गंगापूर या भागामध्ये गारांचा पाऊस पडला आहे.निलंगा तालुक्यातील कासार शिरशी, हासोरी परिसरात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला आहे. लातूर ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. औसा तालुक्यातील गावातही पावसाची हजेरी होती 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram