Latur Accident : लातूमधील अपघातात बीड जिल्हा न्यायाधीश उद्धव पाटील यांचा मृत्यू
Continues below advertisement
लातूरमध्ये १२ तारखेला एक भीषण अपघात झाला. या अपघातात बीड जिल्हा न्यायाधीश उद्धव पाटील यांचा मृत्यू झालाय. पानगाव जवळील सेवाग्राम तांड्याजवळ विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचा ताबा सुटल्याने हा ट्रक उद्धव पाटील यांच्या कारवर येऊन आदळला. आणि यातच उद्धव पाटील आणि त्यांचा कारचालक बळी टमके यांचा मृत्यू झाला. उद्धव पाटील हे नुकतेच बीड येथील जिल्हा न्यायालयात दिवाणी ब न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. उद्धव पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement