Latur |औराद शहाजनी येथील बंधाऱ्यात झाडं अडकल्याने दरवाजे बंद होईना,बंधाऱ्यातील सर्व पाणी वाहून गेलं

चार दिवसापूर्वी झालेल्या तुफान पावसात औराद शहाजानी येथे तेरणा नदीवरील बॅरेजचे नऊ दरवाजे उघडण्यात आले होते या बॅरेजची क्षमता आहे 3.60 दलघमी. पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेली झाडं सोयाबीनच्या भनिम या दरवाजात अडकल्या कारणानं पूर ओसरल्यानंतर ही दरवाजा बंद करणं शक्य झाले नाही. पाटबंधारे विभाग मागील दोन दिवसापासून दिवस-रात्र काम करतोय मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडकलेली झाड आणि सोयाबीन चा कचरा निघता निघत नाहीये. दरवाजे बंद न करता आल्या कारणामुळे या बॅरेजेस मधलं सर्व पाणी वाहून गेले. येणाऱ्या काळातील पाण्याच्या येवा वर इथल्या पाण्याची स्थिती अवलंबून आहे. पुराच्या पाण्याने आजूबाजूची पूर्ण शेती नष्ट केली आहे मात्र भविष्यातील सिंचनासाठीच्या पाणीच आता वाहून गेल्यानं दुहेरी प्रश्न निर्माण झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola