Lakshay Sen at All-England : लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरीत
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 10:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठलीय. लक्ष्यनं उपांत्य फेरीत मलेशियाच्या ली झी झियाचं कडवं आव्हान तीन सेट्समध्ये मोडीत काढलं. त्यानं हा सामना २१-१३, १२-२१,२१-१९ असा जिंकला. ऑल इंग्लंड बॅडमिंटनमध्ये याआधी १९८० साली प्रकाश पदुकोण आणि २००१ मध्ये पुलेला गोपीचंद या दोन भारतीयांनी विजेतेपद पटकावलंय. त्यामुळे तब्बल २२ वर्षांनी लक्ष्य सेन भारताला ऑल इंग्लंड बॅडमिंटनचं विजेतेपद मिळवून देणार का याचीच आता उत्सुकता आहे.