India-China Faceoff | 'LAC वर स्थिती तणावपूर्ण, मात्र आपलं सैन्य सज्ज': लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

लडाख : पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन दिवस लडाखचा दौरा केल्यानंतर लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी म्हटलं आहे की, 'LAC वर स्थिती तणावपूर्ण आहे, मात्र आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील तीन महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे मात्र आपल्या जवानाचं मनोबल उंचावलेलं आहे', असं ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola