Ganeshotsav 2020 | कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना 10 दिवस क्वॉरंटाईन व्हावं लागणार

Continues below advertisement
कोकण, गणेशोत्सव आणि चाकरमानी हा नातेसंबंध आता सर्वांनाच ठावूक आहे. पण, यंदा विघ्नहर्त्याचं आगमन होत असताना सावट आहे ते कोरोनाचं. गणेशोत्सवात चाकरमानी येणार म्हटल्यावर त्यांच्याकरता क्वारंटाईन कालावधी किती असावा? चाकरमान्यांनी किती दिवस अगोदर गावी यावं? चाकरमान्यांकरता असणारे नियम, आरती असो अथवा भजन या साऱ्यावर यंदा कोरोनाचं सावट दिसन येत आहे. परिणामी वाद, मतभेद आणि मतमतांतरे यांची देखील किनार यंदाच्या गणेशोत्सवावर दिसून येत आहे. अवघ्या 21 दिवसांवर गणपती बाप्पाचं आगमन आलेले असताना राज्यकर्त्यांकडून कोणताही निर्णय झालेला नाही. केवळ लवकरच निर्ण होईल या एका वाक्यावर वेळ मारून नेली जात असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे कोकणी माणसामध्ये सध्या तरी संभ्रम दिसून येत आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram