Kolhapur Venus Corner : कोल्हापुरातल्या व्हीनस कॉर्नर चौकात पाणी, वाहतूक काही प्रमाणात बंद

Continues below advertisement

कोल्हापुरातल्या व्हीनस कॉर्नर चौकात पाणी यायला सुरुवात, व्हीनस चौकातून होणारी वाहतूक काही प्रमाणात बंद 

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आजराज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तीन ते चार दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस

मागील तीन ते चार दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावासामुळं नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram