Dasara Melava 2023 : कोल्हापुरातून हजारो शिवसैनिक मुंबईच्या दिशेनं रवाना : ABP Majha

मुंबईत दोन मैदानावर दोन मेळावे आणि दोन प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत... दादरच्या शिवाजी पार्कातून परंपरेनुसार उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत... तर दुसरीकडे आझाद मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा असणार आहे... शिवसेनेत दोन गट पडल्यानं आता कार्यकर्ते आपआपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी रवाना झालेत...  मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झालीए.  आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीडच्या सावरगाव येथेही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणारेय... महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर पंकजा मुंडेंचा हा मेळावा होतोय. दरम्यान, उद्धव ठाकरेंची मशाल कुणाला धग देणार, तसेच, एकनाथ शिंदे धनुष्यातून कुणावर बाण सोडणार आणि पंकजा मुंडे मनातली खदखद मांडत कुणाला लक्ष्य करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola