Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी

Continues below advertisement

एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावड्यात नुकतीच घडली. वारकरी संप्रदायातील एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी अंत्यविधीची तयारीही केली. पण रुग्णालयातून घरी जाताना एक चमत्कार घडला... आणि तात्या जिवंत झाले... पाहूयात कोल्हापुरात नेमकं काय घडलं?जपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरलेले आहेत. पण कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. घरी सर्व पाहूणे जमले, अंत्यविधीची तयारी झाली, त्यानंतर रुग्णालयातून घरी अंतयात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होते. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram