Shrikant Shinde speech Kolhapur: एकनाथ शिंदेंसमोर भाषण, श्रीकांत शिंदेंच्या डोळ्यात पाणी
कोल्हापूर: लहानपणी माझे बाबा कायम शिवसैनिकांसोबत असायचे. त्यांना आमच्याकडे द्यायला वेळही नसायचा, असे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. ते शुक्रवारी शिवसेनेच्या (Shivsena) कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन बोलत होते. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे बालपणीच्या वडिलांसोबतच्या आठवणी सांगताना काहीसे भावूक झाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कंठ दाटून आल्याने थोडावेळ त्यांना पुढे बोलताच आले नाही. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.