Sharad Pawar speech Kolhapur:मलिक,देशमुख,राऊत घाबरले नाहीत,तुम्ही का घाबरला?मुश्रीफांवर तुफान हल्ला

Sharad Pawar speech Kolhapur:मलिक,देशमुख,राऊत घाबरले नाहीत,तुम्ही का घाबरला?मुश्रीफांवर तुफान हल्ला

कोल्हापूर:  सत्तेचा वापर हा विरोधकांना नामोहराम करण्यासाठी सुरू आहे. कोल्हापूरमध्ये एका नेत्याच्या घरी ईडी, आयकर विभागाने धाडी मारल्या. त्या घरातील भगिनींनी आम्हाला हवं तर गोळ्या मारा पण असा छळ नको असे बोलण्याचे धाडस दाखवले. मात्र, त्या घरच्या नेत्यांना हे धाडस दाखवता आलं नाही आणि ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना नाव न घेता टोला लगावला. कोल्हापुरातील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सत्तेचा गैरवापर कुणी केला, तरुणांना कुणी बिघडवल? हे सगळं आपण बदलू. मोदींच्या हातातून सत्ता काढून घेऊन तरुणांच्या हाती देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचेही पवार यांनी म्हटले. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola