Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज दत्तकच, जनताच खरी वारसदार , खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान

Continues below advertisement

Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज दत्तकच, जनताच खरी वारसदार , खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान
खासदार संजय मंडलिक यांनी निवडणुकीच्या तोंडावर एक वादग्रस्त विधान केलंय. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलंय. हे कोल्हापूरचे आहेत का असा सवाल त्यांनी केलाय. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं संजय मंडलिक म्हणाले. आपले वडील सदाशिवराव मंडलिक यांनीच खरा पुरोगामी विचार जपला असं मंडलिक म्हणाले. मल्लाला हातच लावायचा नाही... मल्लाला टांगच मारायचे नाही...  मग ती कुस्ती कशी होणार ?  संजय मंडलिक यांनी विचारलाय. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram