Kolhapur Restaurants Reopen! अनलॉकमधील खवय्येगिरी, कोल्हापूरकरांनी मारला तांबड्या-पांढऱ्यावर ताव!
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. मात्र अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे.
Tags :
Maharashtra Hotels Reopen Lodges Reopen Maharashtra Lockdown Nagpur Nashik Hotels Restaurants Pune Mission Begin Again Kolhapur Mumbai CM Uddhav Thackeray Coronavirus