Kolhapur Rain | कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, पाणी पातळी 41 फूट 2 इंचांवर
Continues below advertisement
कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीने धोका पातळीकडे वाटचाल केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी केवळ दोन फूट बाकी आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 2 इंचावर आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली असून शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement