Kolhapur : मनपा अधिकाऱ्यांचे होर्डिंग बनवून 'मी कचरा खातो' असा मजकूर,पालिकेविरोधात नागरिकांचं आंदोलन
कोल्हापूर महापालिका कचरा उचलत नसल्याने जरगनगर परिसरातील नागरिकांचं आंदोलन सुरु आहे. थेट कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे होर्डिंग बनवून मी कचरा खातो असा मजकूर लिहिला आहे. शिवाय मी जर कचरा नियोजन केले नाही तर माझ्या अंगावर कचरा टाका असं देखील होर्डिंगवर लिहिलं आहे. रास्ता रोको सुरु आहे.