Petrol Prices | पेट्रोल दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत; पेट्रोल विक्रेत्याचा वैधानिक इशारा

Continues below advertisement

कोल्हापूर : "पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार राहणार नाही," असा मेसेज असलेली पाटी पुण्यातली नाहीतर कोल्हापुरातील आहे. इंधनाच्या दरवाढीनंतर कोल्हापुरातील एका पेट्रेल पंपावरील फलकावर हा अनोखा मेसेज लिहिण्यात आला आहे. 

राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दरात सातत्याने वाढत आहेत. आता कोणत्याही क्षणी पेट्रोलचे दर प्रति लिटर शंभर रुपयांच्या दरात पोहोचण्याची चिन्हे आहेत. पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. साहजिकच महागाईवर त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आला आहे.

त्यातच पेट्रोल-डिझेलच्या या दरवाढीवरुन कोल्हापुरातील एका पेट्रोल पंप मालकाने ग्राहकांसाठी दिलेला सूचक इशारा सध्या सोशल मीडियातून चांगलाच चर्चेत आला आहे."पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार राहणार नाही : पेट्रोल पंप मालक संघटना" असा वैधानिक इशारा देणारा हा मेसेज आहे.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील पुलाची शिरोली येथील सांगली फाट्यावरील कोरगांवकर पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी हा सूचक इशारा देण्यात आला आहे. पेट्रोल पंपावरील हा मेसेज सोशल मीडियातून व्हायरल झाला असून पंप मालकांनीही याला दुजोरा दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram