Kolhapur : कोल्हापुरात 2 दिवस मांसाहाराची दुकानं बंद, पर्युषण काळात जैन समाजानं केलेली मागणी मान्य
आज आणि 31 तारखेला कोल्हापुरातील मटणाची दुकाने बंद राहणार आहेत...पर्युषण पर्व सुरू झाले आहे...या काळात बळी देऊ नये अशी मागणी जैन समाजाने केली...त्यानंतर दोन दिवस मटण विक्री बंद ठेवण्याची भूमिका मटणविक्रेत्यांनी घेतली...कोल्हापूर महापालिकेने काढलेल्या परिपत्रकामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं...कोल्हापुरात 8 दिवस नाही तर केवळ 2 दिवस मटण विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत...मात्र दोन दिवस तरी दुकानं बंद का अशी मागणी काही जणांनी घेतलीय...