Milk Price Hike: दिवाळीच्या तोंडावर दुधाचे दर वाढले,JanuaryतेMarchदरम्यान दुधाचे दर वाढण्याची शक्यता
ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाचे दर वाढले आहेत आणि हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं निरीक्षण इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी नोंदवलं आहे. जनावरांना झालेल्या लम्पी आजारामुळे पशुधन कमी झालं आहे. तसंच चाऱ्याचीही चंटाई आहे. याशिवाय यावेळी दूध पावडरचं उत्पादनही घटलं आहे. त्यामुळे जानेवारीनंतर दूध संकलन कमी झाल्यानंतर मागणीप्रमाणे पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दुधाचे दर प्रतिलिटर ५ ते ६ रुपयाने वाढू शकतात, असा अंदाज आहे.