Kolhapur : कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी, रात्रीच्या वेळी विमानाचं लँडिंग शक्य
आता कोल्हापूरकरांसाठी एक मोठी आणि तेवढीच दिलासादायक बातमी... आता कोल्हापूर विमानतळावर रात्री देखील लँडिंग सुरु झालंय.. काल कोल्हापूर विमानतळावर रात्री उतरलेल्या विमानानं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रवास केला. रात्रीच्या वेळी लँडिंगच्या सुविधेमुळे कोल्हापूरकरांचा विमान प्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा होणार आहे..