
Kolhapur Tomato Stolen : कोल्हापूरच्या हेरबाड गावातील शेतातून चक्क टोमॅटोची चोरी
Continues below advertisement
Kolhapur Tomato Stolen : कोल्हापूरच्या हेरबाड गावातील शेतातून चक्क टोमॅटोची चोरी टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात चक्क शेतातूनच टोमॅटोंची चोरी झाली. सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही हेरवाड गावातील शेतातून 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी झालीय. पाऊस आणि अंधारांचा फायदा घेत ही चोरी करण्यात आलीय. हेरवाडचे शेतकरी अशोक मस्के यांच्या वीस गुंठ्यात टोमॅटोचं पिक तयार झालं होतं. त्यातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता असतानाच चोरांनी 25 कॅरेट टोमॅटोंची चोरी केली.
Continues below advertisement