Kolhapur Terrorism : दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कोल्हापूरही, दहशतवाद्यांची कबुली

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कोल्हापूर असल्याचं उघड झालंय. पुण्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूरमधील चांदोली अभयारण्य आणि चांदोली धरणाचीही रेकी केली असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. यासाठी दहशतवाद्यांनी कोल्हापूर महामार्गावर २ दिवस मुक्काम केल्याची कबुली दिलीय. या माहितीमुळे पाटबंधारे विभाग आणि कोल्हापूर पोलीस अलर्ट झालेत. दहशतवाद्यांनी दिलेल्या कबुलीनंतर कोल्हापूर पोलिसांनी चांदोली अभयारण्य़ परिसरात तपासणी सुरु केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola