Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 2 दिवस ऊसतोड बंद आंदोलन ABP Majha
ऊसाला मिळणाऱ्या एफआरपीच्या च्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी केली आहे. यासह विविध मागण्यांसाठी आज आणि उद्या स्वाभिमानीने ऊसतोड बंद आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, या दोन दिवसात जर कारखाने सुरु ठेवले तर संघर्ष होणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय.