Kolhapur Satej Patil V/S Mahadik : पुन्हा रंगला सतेज पाटील विरुद्ध महाडिक गट सामना?
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सध्या पार पडतेय.. सभेत सुरुवातीपासूनच तणावाचं वातावरण आहे. या सभेच्या निमित्ताने सतेज पाटील गट आणि महाडिक गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. राजाराम कारखान्यावर महाडिक गटाची एकहाती सत्ता आहे. सत्ताधारी गटानं कारखाना कार्यक्षेत्र विस्ताराचा प्रस्ताव ठेवला आहे. तसा ठराव आजच्या सभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. मात्र या ठरावाला सतेज पाटील गटानं ठाम विरोध केला आहे.
Tags :
Annual General Meeting Strong Opposition Mahadik Group Atmosphere Of Tension One-Handed Power Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory Satej Patil Group Proposal To Expand Factory Scope